(चिंचवड,प्रतिनिधी दि. २६) : चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याधुनिक स्विच रायफल शूटिंग रेंज व पिस्टल प्रशिक्षण सुविधेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली नेमबाजीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार (Pratibha International School)आहे.
या सुविधेचे उद्घाटन प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा यांच्या हस्ते, तर शाळेच्या प्राचार्या डॉ. वृंदा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा, उपप्राचार्या लिजा सोजू, समन्वयक गुलनाज खान, प्रशिक्षक विजय रणझुंजारे, राष्ट्रीय खेळाडू प्रमिला कांबळे, डायनॅमिक स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक रमेश वराडे, ज्योती वराडे, कीर्ती मिसळ, प्रतीक पांचाळ, भूषण पाटील, आर्या तसेच शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित(Pratibha International School) होते.
ही अत्याधुनिक शूटिंग रेंज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली आहे. प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली व सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. दीपक शहा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सुरक्षितता आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित(Pratibha International School) केले.
शालेय विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण पिंपरी-चिंचवड रायफल शूटिंगचे प्रशिक्षक विजय रणझुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार (Pratibha International School)आहे.
उद्घाटनप्रसंगी डॉ. भूपाली शहा म्हणाल्या, “नेमबाजी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळेल. या खेळातून एकाग्रता, शिस्त, अचूकता, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. क्रीडा हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी नव्हे, तर मानसिक दृढतेसाठीही अत्यंत आवश्यक(Pratibha International School) आहे.”
प्राचार्या डॉ. वृंदा जोशी म्हणाल्या, “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता क्रीडा, कला आणि इतर कौशल्यांमध्येही प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज त्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल (Pratibha International School)आहे.”
संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या रेंजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे बसविण्यात आली आहेत. प्रत्येक प्रशिक्षण सत्रापूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, त्यांचे काटेकोर पालन बंधनकारक (Pratibha International School)असेल.
या अत्याधुनिक सुविधेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि क्रीडाविषयक गुणवत्ता विकसित होण्यास मोठी मदत होणार असून, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलने क्रीडा क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला (Pratibha International School)आहे.
