के-विले (ता._11 NOV__) :
के-विले – श्रीनगर – बापदेवनगर हा मुख्य मार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून, रस्त्यावर खोल खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यामुळे नागरिकांना दररोज प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा, शेतकऱ्यांचे दळणवळण, रुग्णवाहिका वाहतूक आणि (Bapu Katale Protest Warning) दैनंदिन हालचाली यावर गंभीर परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर बापू कातळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने (Bapu Katale Protest Warning) लक्ष देऊन काम हाती घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, “अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कामास सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात तर हा रस्ता चिखलमय होतो आणि वाहनांची व पादचार्यांची अवस्था बिकट होते. जर ही मागणी पुन्हा दुर्लक्षित झाली, तर (Bapu Katale Protest Warning) आम्ही शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारू, अशी चेतावणी देण्यात आली आहे.”
स्थानिकांनी शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे, अन्यथा पुढील आठवड्यात आंदोलनाचा (Bapu Katale Protest Warning) कार्यक्रम जाहीर केला जाईल, असा इशाराही दिला आहे.
