पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त मुकेश कोळप सध्या रजेवर असल्याने नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महापालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला (Anna Bodade PCMC)आहे.
दि. १४ ऑगस्टपासून बोदडे यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून, मुकेश कोळप पुन्हा सेवेत रुजू होईपर्यंत बोदडे नगरसचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी पाहणार (Anna Bodade PCMC) आहेत .
