पिंपरी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ‘सर्वसाधारण (General)’ प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एकूण २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत आज मंत्रालय, मुंबई येथे पार पडली. ही सोडत प्रक्रिया नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून, अनेक दिग्गज नगरसेवकांची नावे पुढे येत आहेत.
महापौर पदाचे प्रबळ दावेदार….
1. भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे
(सलग 3 वेळा नगरसेवक)
2. श्री. शितल उर्फ विजय शिंदे
(गेल्या 25 वर्षांपासून भाजपा सोबत एक निष्ठ)
भारतीय जनता पक्षाचे सलग 3 वेळा नगरसेवक. 2017 मध्ये महापौर व स्थायी समिती अध्यक्ष पदाची संधी हुकली.
3. रवी लांडगे (भारतीय जनता पक्षाचे सलग 2 वेळा बिनविरोध नगरसेवक)
महापालिकेतील सध्याची राजकीय स्थिती
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२८ सदस्यांच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपकडे एकूण ८४ जागा असून, प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ३७ जागा आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) ६ आणि १ अपक्ष नगरसेवक आहे. या संख्याबळामुळे आगामी महापौरपद भाजपकडेच राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
पुढील प्रक्रिया काय?
आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता विभागीय आयुक्तांमार्फत महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. महापौरपदासाठी इच्छुक नगरसेवकांना अर्ज दाखल करावे लागतील. त्यानंतर साधारणतः पुढील १५ दिवसांच्या आत विशेष सभा बोलावून नवीन महापौरांची अधिकृत निवड केली जाणार आहे.
शत्रुघ्न काटे महापौर पदाचे प्रबळ दावेदार
महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे भाजपमधील अनेक ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवकांची नावे चर्चेत असली, तरी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांचे नाव सध्या सर्वाधिक आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
शत्रुघ्न काटे हे पक्षसंघटन, निवडणूक व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद यासाठी ओळखले जाणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्ता मिळवली आहे. या यशामागे काटे यांची रणनीती, संघटन कौशल्य आणि पक्षातील एकजूट महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.
गेल्या पंचवार्षिक कार्यकाळातही शत्रुघ्न काटे हे महापौर पदाच्या शर्यतीत शेवटपर्यंत आघाडीवर होते, मात्र ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलल्याने त्यांना डावलण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर यावेळी “त्यांच्या अनुभवाला आणि पक्षासाठी दिलेल्या योगदानाला न्याय द्यावा,” अशी भावना भाजपमधील अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
भाजप श्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
महापौरपदाचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार असला, तरी सध्याची राजकीय परिस्थिती, संख्याबळ आणि संघटनात्मक योगदान पाहता शत्रुघ्न उर्फ बापू काटे हे महापौर पदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत भाजपच्या अंतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, शहराचे लक्ष आता महापौर निवडीच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या सोडतीला संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला (PCMC Mayor Election)आहे.
भाजपला निर्विवाद बहुमत
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आगामी महापौरपदावर भाजपच्या महिला नगरसेविकेचीच निवड निश्चित मानली जात असून, कोणत्या नगरसेवकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले (PCMC Mayor Election) आहे. तरीही आताच्या घडीला शत्रुघ्न काटेहेच प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
पक्षीय बलाबल (एकूण १२८ जागा)
पक्ष
जागा
भारतीय जनता पक्ष
८४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
३७
शिवसेना (शिंदे गट)
०६
अपक्ष
०१
पुढील प्रक्रिया काय?
आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता पुढील टप्प्यात महापौर निवडीची औपचारिक प्रक्रिया सुरू होणार आहे.
नोटीस जाहीर – विभागीय आयुक्तांमार्फत महापौर निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल.
अर्ज दाखल – इच्छुक महिला नगरसेविकांना महापौरपदासाठी अर्ज दाखल करावे लागतील.
विशेष सभा – साधारणपणे पुढील १० ते १५ दिवसांत महापौर निवडीसाठी विशेष सभा बोलावली जाणार आहे.
अधिकृत निवड – बहुमताच्या आधारे नवीन महापौरांची निवड (PCMC Mayor Election) होईल.
