पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी अधिक वेगाने काम करण्याचा निर्धार
पिंपरी, दि. १७ जानेवारी (प्रतिनिधी) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला एकहाती कौल दिला आहे. विकासाचे स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण व्हिजन नागरिकांनी स्वीकारले असून, आगामी काळात हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी (BJP Historic Victory) केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपने एकूण १२८ जागांपैकी ८५ जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयासह शहराच्या राजकीय इतिहासात भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या घवघवीत यशानंतर पक्ष कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, पिंपरीतील मोरवाडी येथील भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त (BJP Historic Victory)केला.
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, माजी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, विजय फुगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (BJP Historic Victory) होते.
याप्रसंगी आमदार शंकर जगताप म्हणाले, “या निवडणुकीत भाजपने मांडलेले विकासाचे स्पष्ट व्हिजन, पायाभूत सुविधांचा विस्तार, सक्षम नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था तसेच पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मतदारांनी विकासाला प्राधान्य देत भाजपच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय म्हणजे नागरिकांनी दाखवलेला विश्वास असून, तो सार्थ ठरविण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम (BJP Historic Victory) करू.”
यावेळी उपस्थित सर्वांनी शहरवासीयांचे आभार मानत, आगामी काळात पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त(BJP Historic Victory) केला.
