पिंपरी-चिंचवड :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत पैलवान महेश लांडगे यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. “अजित पवार हे पिंपरी-चिंचवडचेच नव्हे, तर महाराष्ट्राचेच आका आहेत. हे त्यांनी स्वतःच जाहीर करावे,” असे म्हणत लांडगेंनी जोरदार टीका(Ajit Pawar Criticism)केली.
अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या ‘आक्याचा’ उल्लेख केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक झाले आहेत. “स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत. आधी स्वतःच्या कुटुंबातील, विशेषतः मुलगा पार्थ पवार यांच्या पराक्रमांकडे लक्ष द्यावे,” असा इशारा लांडगेंनी (Ajit Pawar Criticism)दिला.
लांडगेंनी पुढे आरोप करत म्हटले की, “सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतो आहे. ते नैराश्यातून अशी वक्तव्ये करत आहेत.” एकेकाळचे राजकीय ‘वस्ताद’ असलेले अजित पवार आणि पैलवान महेश लांडगे यांच्यातील संघर्षामुळे पिंपरी-चिंचवडचा राजकीय आखाडा तापला(Ajit Pawar Criticism) आहे.
“जे स्वतःच्या काकांचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी-चिंचवडचे काय होणार?” असा टोला लगावत लांडगेंनी अजित पवारांची खिल्ली उडवली. तसेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे असतील, तर मी, महापालिका प्रशासन आणि अजित पवार यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी. सर्व प्रश्नांची उत्तरे तेव्हाच समोर येतील, असे खुले आव्हान महेश लांडगेंनी(Ajit Pawar Criticism) दिले.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पुन्हा एकदा दादा विरुद्ध पैलवान अशी थेट लढत रंगताना दिसत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही संघर्षरेषा अधिक तीव्र होण्याची(Ajit Pawar Criticism) चिन्हे आहेत.
