पुणे : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या भीषण अपघातानंतर हजारो प्रवाशांना अक्षरशः ‘जिवंत नरक’ अनुभवावा लागला. खंडाळा घाट परिसरात गॅस वाहतूक करणारा टँकर पलटल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे अनेक वाहनांमध्ये अडकलेले प्रवासी तब्बल २० ते ३० तासांहून अधिक काळ हालअपेष्टांना सामोरे (Expressway Traffic Jam) गेले.
अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. परिणामी पुणे आणि मुंबई दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कार, खासगी वाहने, लक्झरी बसेस, एसटी बसमधील प्रवासी जागच्या जागी अडकून (Expressway Traffic Jam) पडले.
अन्न-पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल
रात्रभर आणि पुढील दिवसभर वाहनांत अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी आणि शौचालयाच्या सुविधांचा तीव्र अभाव जाणवला. थंडीमुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी प्रवाशांचे विशेष हाल झाले. अनेकांनी पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण करावी लागल्याचे सांगितले. काही प्रवाशांनी तब्बल १० ते १२ तास अन्नाशिवाय प्रवास केल्याचे अनुभव कथन (Expressway Traffic Jam) केले.
गरजेचा गैरफायदा घेत लूटमार
अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचा गैरफायदा घेत काही ठिकाणी वस्तूंची चढ्या दराने विक्री झाल्याचे चित्र दिसून आले. पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, खाद्यपदार्थ यांचे दर दुप्पट-तिप्पट आकारले जात असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. गरजेच्या क्षणी मदतीऐवजी लूटमार होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात(Expressway Traffic Jam) आला.
प्रशासनावर टीकेची झोड
इतका मोठा ट्रॅफिक जाम असतानाही वेळेत मूलभूत सुविधा न पुरवल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. टोल वसुली सुरूच राहिल्यानेही प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात (Expressway Traffic Jam) आहे.
अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर गॅस टँकर हटवून वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. मात्र या घटनेने द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले (Expressway Traffic Jam) आहे.
