(पिंपरी-चिंचवड) : शहरातील कचरा, अपुरा पाणीपुरवठा, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, स्वच्छता आणि आरोग्य यांसह अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सभा तहकूब झाल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले (PCMC General Body Meeting)आहेत.
महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत नगरसदस्यांकडून प्रभागातील पाणी, कचरा, स्वच्छता आणि इतर नागरी समस्यांवर प्रश्न उपस्थित केले जाणार होते. मात्र, काँग्रेसकडून ‘वंदे मातरम्’ गीताच्या मुद्द्यावर आक्षेप घेत सभा तहकूब करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला भाजप सदस्यांनी विरोध(PCMC General Body Meeting) केला.
यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून घोषणाबाजी झाली. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब करून त्यानंतर नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, बहुमताच्या जोरावर भाजपने सभा तहकूब केल्याचा आरोप विरोधकांनी केला. पुढील सर्वसाधारण सभा १९ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात(PCMC General Body Meeting) आले.
नागरी प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना राजकीय वादामुळे सभा तहकूब झाल्याने नागरिकांच्या समस्या कधी मार्गी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे. आता पुढील सभेत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर ठोस चर्चा होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले (PCMC General Body Meeting)आहे.
