पिंपरी – वेदना जेव्हा काळजात रुततात, तेव्हा त्यातून शब्दांचे धुमारे फुटतात आणि त्यातूनच कसदार कविता जन्माला येते. कविता ही जाणिवांशी तादात्म्य पावणारी असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी(Indrayani Sahitya Parishad) .
मोशी येथे इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित एकदिवसीय काव्यलेखन कार्यशाळेत ते बोलत होते. केवळ कल्पनारंजनावर आधारित कविता करण्यापेक्षा वास्तवाला स्पर्श करणारी कविता अधिक जिवंत आणि प्रभावी ठरते, असेही त्यांनी यावेळी नमूद (Indrayani Sahitya Parishad) केले.
मराठी कवितेचा दर्जा उंचावावा आणि नवोदित कवींना काव्यलेखनाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने मोशी येथील न्यू इंद्रायणी इंग्लिश स्कूलमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले (Indrayani Sahitya Parishad)होते.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी कवितेचा प्रवास उलगडून सांगताना काव्यरचना ही अत्यंत कठीण प्रक्रिया असल्याचे सांगितले. सभोवतालच्या अनुभवांना हृदयात साठवून त्याचे शब्दांत रूपांतर करणारा खरा कवी असतो, असे ते म्हणाले. काव्यातील व्याकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी वृत्त, अलंकार आणि छंद यांच्या अचूक वापराने काव्याचे सौंदर्य अधिक खुलते, असे(Indrayani Sahitya Parishad) सांगितले.

ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांनीही काव्यलेखनाविषयी मार्गदर्शन केले. कविता ही केवळ लिहिली जात नाही, ती अंतर्मनातून स्फुरते आणि त्यानंतर तिच्यावर संस्कार केले जातात, असे त्यांनी सांगितले. मार्गदर्शन करताना त्यांनी आद्यकवी मुकुंदराजांपासून संतकवी, पंडितकवी, शाहिरी परंपरा आणि नवकाव्यापर्यंतचा आढावा घेतला. विविध रूपके, प्रतिमा आणि उपमा यांच्या साहाय्याने तंत्रशुद्ध काव्यलेखन कसे करावे, याचेही त्यांनी मार्गदर्शन (Indrayani Sahitya Parishad)केले.
या कार्यशाळेला ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, शिवाजी चाळक, सौ. मंगला पाटील आणि सौ. रजनी अहेरराव यांची उपस्थिती(Indrayani Sahitya Parishad) होती.
इंद्रायणी साहित्य परिषदेचे सचिव रामभाऊ सासवडे, तेजस्विनी देशमुख, मीनल साकोरे, संतोष नामदेव सस्ते, श्रीहरी तापकीर, भाऊ सस्ते, अमर कांदे आणि सुनील सस्ते यांनी कार्यशाळेचे संयोजन(Indrayani Sahitya Parishad) केले.
या कार्यशाळेत सुमारे ४२ कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतला. त्यामध्ये कवयित्री माधुरी विधाटे, प्रा. जयश्री थोरवे, पल्लवी पाटील, स्वाती काथवटे, प्रा. पौर्णिमा कोल्हे, सुरेखा फल्ले, श्रद्धा चटप, रसिका सस्ते, शीतल परब, मंगेश शिंगटे, बाळकृष्ण हवालदार, अवधूत बोऱ्हाडे, रविंद्र पाटील, सोनाली तापकीर, शुभम दातखिळे, ॲड. नजीम शेख, सुदाम शिंदे, तृप्ती थोरात आणि राधिका पाटे यांचा समावेश (Indrayani Sahitya Parishad)होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे यांनी कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट केले. सौ. मीनल साकोरे यांनी सूत्रसंचालन (Indrayani Sahitya Parishad)केले.
