पिंपरी प्रतिनिधी :स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले (Swachh Survekshan) आहे.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी संयुक्तपणे नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले (Swachh Survekshan)आहे.
स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिकांचा सहभाग आणि सार्वजनिक सुविधांची गुणवत्ता या निकषांवर केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण घेतले जाते. कचरा विलगीकरण, घरगुती कचरा संकलन, कचरा प्रक्रिया, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि नागरिकांचे समाधान या बाबींवर शहरांचे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे नागरिकांनी दिलेला अभिप्राय शहराच्या क्रमवारीत निर्णायक ठरणार (Swachh Survekshan)आहे.
महापालिकेकडून शहरात घरोघरी कचरा संकलन, स्वच्छता जनजागृती, परिसर स्वच्छता मोहीम आणि विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी विविध माध्यमांतून जनसंपर्क मोहिमाही सुरू आहे. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने (Swachh Survekshan)सांगितले.
नागरिकांनी अभिप्राय कसा द्यावा?
१) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
२) मोबाईल क्रमांक नोंदवा.
३) राज्य – महाराष्ट्र, जिल्हा – पुणे आणि ULB – पिंपरी-चिंचवड निवडा.
४) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भरा.
५) मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून फॉर्म सबमिट करा.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, स्वच्छ सर्वेक्षणात शहराला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून अभिप्राय (Swachh Survekshan) द्यावा.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नमूद केले की, स्वच्छ आणि निरोगी शहर घडवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. अंतिम मुदतीपूर्वी सर्वांनी अभिप्राय (Swachh Survekshan) नोंदवावा.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनीही प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगत मोठ्या प्रतिसादाचे आवाहन (Swachh Survekshan)केले.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नागरिकांच्या सहकार्यामुळेच पिंपरी-चिंचवड अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर बनेल, असा विश्वास व्यक्त (Swachh Survekshan) केला.
