पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२६) – “प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयाचा राष्ट्रीय सण असून, या दिवशी प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली पाहिजे,” असे आवाहन विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोहिदास आल्हाट (Republic Day Pimpri) यांनी केले.
चिंचवडगाव येथील क्रांतितीर्थ, क्रांतिवीर चापेकर वाडा येथे क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी समितीचे कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, विश्वस्त मधुसूदन जाधव, नवनिर्वाचित नगरसेविका अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, डॉ. माधुरी आल्हाट यांच्यासह मान्यवर उपस्थित (Republic Day Pimpri) होते.
डॉ. आल्हाट यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनातील फरक समजावून सांगत संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविकात ॲड. सतिश गोरडे यांनी, “२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अस्तित्वात आले असून, लोकशाही मूल्यांमुळेच भारताची प्रगती सुरू आहे,” असे मत व्यक्त(Republic Day Pimpri) केले.

या कार्यक्रमात समिती संचलित शाळेतील विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर सामुदायिक राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून ध्वजवंदन केले. तसेच हर्षदा धुमाळ यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या देशकार्याची माहिती(Republic Day Pimpri) दिली.
सुधाकर हांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर विनोद देशपांडे यांनी आभार (Republic Day Pimpri)मानले.
