प्रतिनिधी : आजच्या युवकांचे मन, मेंदू आणि मनगट सक्षम करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र हीच खरी प्रेरणा असल्याचे मत शिवव्याख्याते भरत पांगारे यांनी व्यक्त केले.डांगे चौक, चिंचवड येथे १८ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत ‘छत्रपती शिवराय म्हणजे मूर्तिमंत जीवनविद्या’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत (PCMC Shivjayanti ) होते.
यावेळी विद्युत पर्यवेक्षक प्रमोद खाडे, निवेदक किशोर केदारी, करण तुपे, संकेत जोशी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश परब, जयवंत साळुंखे, संदीप साळुंखे, मधुकर लोहार, जितेंद्र साळुंखे, अमित मिसाळ, बिंदूमाधव देशपांडे, वसंत शिंदे, जयरामन अण्णा यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित (PCMC Shivjayanti )होते.
भरत पांगारे यांनी अलौकिक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि सद्गुरू वामनराव पै यांनी प्रतिपादित केलेल्या जीवनविद्येची सांगड घालत विविध पोवाडे, उदाहरणे आणि दाखले देत शिवचरित्राची प्रभावी उजळणी केली. जीवनविद्या मिशनचे आदर्श म्हणून शिवाजी महाराज किती पूजनीय आहेत, हे त्यांनी विविध पैलूंमधून उलगडून (PCMC Shivjayanti ) सांगितले.
जगभरात हजारो-लाखो राजे होऊन गेले, मात्र दुर्गुणरहित राजा म्हणून शिवाजी महाराज अद्वितीय ठरतात, असे त्यांनी नमूद केले. जीवनविद्या मिशन आणि शिवचरित्राच्या माध्यमातून अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, महिला सन्मान, जातीयता, विषमता आणि धर्मांधता अशा विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन (PCMC Shivjayanti ) केले.
कार्यक्रमाची सुरुवात जीवनविद्या प्रणीत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठ आणि प्रबोधनात्मक नामसंकीर्तनाने झाली.प्रख्यात शिवव्याख्याते भरत पांगारे यांनी आपल्या ओघवत्या, सुस्पष्ट आणि मधुर वाणीने सुमारे अडीच तासांच्या प्रभावी व्याख्यानातून श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. यावेळी शंकर गणगे महाराज, ऋषिकेश कांबळे, शरद बोरगे, लक्ष्मण शिंदे, सरोज ठाकरे, मानसी परब, सुचिता वाडेकर आदी कलाकारांनी साथसंगत करत कार्यक्रमात रंगत (PCMC Shivjayanti ) आणली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी (PCMC Shivjayanti ) केले.
