(विवेक कुलकर्णी )भारतीय क्रिकेटला नवा सुपरस्टार लाभल्याची जोरदार चाहूल देत सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी साकारली. त्याच्या तुफानी शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैद्राबादने दिल्ली कॅपिटल्सचा ४७ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम (Ipl 2026 SRH VS DC) राखले.
काल झालेल्या या महत्त्वाच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय अभिषेक शर्माच्या वादळी फलंदाजीसमोर पूर्णपणे फसला. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अभिषेकने दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. चौफेर फटकेबाजी करत त्याने अवघ्या काही षटकांत शतक पूर्ण केले आणि संघाला भक्कम धावसंख्या उभारून (Ipl 2026 SRH VS DC ) दिली.
अभिषेक शर्माने तब्बल १३५ धावांची धडाकेबाज खेळी करत दिल्लीसमोर मोठे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव नियमित अंतराने कोसळत गेला. हैदराबादच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. मलिंगाने ४ विकेट घेत दिल्लीच्या आशा संपुष्टात(Ipl 2026 SRH VS DC ) आणल्या.
या विजयासह हैदराबादने सलग तिसरा विजय नोंदवत गुणतालिकेतील आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला या पराभवामुळे मोठा धक्का बसला (Ipl 2026 SRH VS DC ) आहे.
अभिषेक शर्माच्या या स्फोटक खेळीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली असून, आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात तो किती महत्त्वाचा ठरणार याची झलक पुन्हा एकदा पाहायला (Ipl 2026 SRH VS DC ) मिळाली.
