पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ व ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी १,००० रोपांची लागवड करून शहरात ५ लाख वृक्ष लावण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात (PCMC Green Campaign)आला.
महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन केले. खासदार श्रीरंग बारणे यांनी वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आमदार अमित गोरखे यांनी प्रत्येकाने किमान एक झाड जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. आमदार उमा खापरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज अधोरेखित (PCMC Green Campaign)केली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुर्गादेवी टेकडी हे शहराचे नैसर्गिक वैभव असल्याचे सांगत शहरातील वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती (PCMC Green Campaign)दिली.
यावेळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी विजय जगताप लिखित ‘दुर्गा टेकडीचा ५० वर्षांचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ग.दि. माडगूळकर नाट्यगृह ते दुर्गादेवी टेकडी दरम्यान आयोजित १० किलोमीटर सायकल फेरीत शेकडो सायकलप्रेमींनी सहभाग (PCMC Green Campaign)घेतला.
कार्यक्रमादरम्यान दुर्गादेवी टेकडीच्या विकासासाठी योगदान देणारे माजी प्रशासक हरनामसिंग, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंढे आणि तत्कालीन मुख्य उद्यान अधीक्षक शांताराम भोंडवे यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. शेवटी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त (PCMC Green Campaign)केला.
