(पिंपरी, दि. १७ जुलै २०२६) : पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहात ‘पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा’ उत्साहात पार पडला. यावेळी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी, “नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते. त्यांची कविता ही मानवमुक्तीची कविता आहे,” असे गौरवोद्गार (Narayan Surve Kavyajagar)काढले.
या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर होते. यावेळी अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, शोभा बंब, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त कवी सीताराम नरके यांची प्रमुख उपस्थिती(Narayan Surve Kavyajagar) होती.
डॉ. सबनीस यांनी आपल्या भाषणात नारायण सुर्वे यांच्या कवितेतील सामाजिक भान, मानवतावादी विचार आणि मातृत्वाचा गौरव अधोरेखित करत, अन्याय सोसूनही त्यांच्या लेखणीत कटुता नव्हती, असे (Narayan Surve Kavyajagar)सांगितले.

सन्मानाला उत्तर देताना प्रा. सुरेखा कटारिया यांनी सहजीवन, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनुभव मांडला. वर्षा भोरे, रोहित खर्गे, पल्लवी बनसोडे-परुळेकर आणि राजू जाधव यांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले मनोगत (Narayan Surve Kavyajagar)मांडले.
यावेळी वर्षा भोरे यांना ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान’, रोहित खर्गे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार’, पल्लवी बनसोडे-परुळेकर यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे विचारसाधना पुरस्कार’ आणि राजू जाधव यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान’ प्रदान करण्यात (Narayan Surve Kavyajagar)आला.
अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब भोईर यांनी, “बुद्धीने श्रीमंत होता येते; पण श्रीमंतीने बुद्धिवंत होता येत नाही,” असे सांगत नारायण सुर्वे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा (Narayan Surve Kavyajagar)दिला.
कार्यक्रमात ‘नारायण सुर्वे काव्यजागर’ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. राजेंद्र वाघ, जयश्री श्रीखंडे, प्रभाकर वाघोले, स्वाती भोसले आणि सीमा गांधी यांनी सुर्वे यांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि आगामी सोळाव्या स्वानंद साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात (Narayan Surve Kavyajagar)आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव सातपुते यांनी केले. संगीता झिंजुरके यांनी निवेदन, प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन तर अरुण गराडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, महेंद्र भारती, प्रा. प्रभाकर दाभाडे, कुमार खोंद्रे, सुप्रिया सोळांकुरे, प्रदीप गांधलीकर तसेच स्वानंद महिला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम(Narayan Surve Kavyajagar) घेतले.

