पिंपरी, दि. २१ जून २०२६ : आज सकाळी १०.५४ वाजता मरकळ रोड, ठाकूर वस्ती, सोळू येथील लक्ष्मी एंटरप्राइजेस डोअर अँड हार्डवेअर या दरवाजे निर्मिती करणाऱ्या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला (Laxmi Enterprises fire) मिळाली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. आगीत दरवाजे तयार करण्यासाठी वापरले जाणारे लाकूड, पीओपी (POP) साहित्य व अन्य ज्वलनशील वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात (Laxmi Enterprises fire)आणली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती असून, अग्निशमन दलाच्या जलद व समन्वयपूर्ण कार्यामुळे मोठा अनर्थ टळला.
कारवाईत सहभागी कर्मचारी :
वाहन चालक : श्री. अजित कुऱ्हाडे
फायरमन : श्री. सुरेश सुळाखे
फायरमन : श्री. सिद्धार्थ गावडे
फायरमन : श्री. सत्यम(Laxmi Enterprises fire) जैद
