पिंपरी (पुणे) : हार्ट प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित ‘अजित पर्व’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित (Ajit Parv Book)होते.
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या दैदीप्यमान जीवनप्रवासाचा, कार्यसंस्कृतीचा, शिस्तप्रिय व कार्यक्षम नेतृत्वाचा, निर्णयक्षम विकासदृष्टीचा तसेच महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे. प्रत्येक वाचकासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात (Ajit Parv Book)आला.
पुस्तकाचे लेखक प्रकाश जाधव यांनी सखोल संशोधन, विविध संदर्भ आणि वास्तववादी मांडणीच्या माध्यमातून अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू प्रभावीपणे उलगडले (Ajit Parv Book)आहेत.
या कार्यक्रमास पुस्तकाचे प्रकाशक विनोद शिंदे (हार्ट प्रकाशन, पुणे), सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, ॲड. लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील, संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे, किरण खोत यांच्यासह अनेक मान्यवर, साहित्यप्रेमी तसेच अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Ajit Parv Book)होते.
हा प्रकाशन सोहळा केवळ एका पुस्तकाच्या प्रकाशनापुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या कार्यक्षम, दूरदृष्टीच्या आणि लोकाभिमुख नेतृत्वाला पुस्तकाच्या माध्यमातून वाहिलेली एक अर्थपूर्ण आदरांजली (Ajit Parv Book)ठरला.

