प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असोसिएशनच्या वतीने कार्याध्यक्ष प्रकाश जवळकर, सचिव डी. डी. फुगे तसेच असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला ताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात (Felicitation Program) आला.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास रावसाहेब खंडागळे, किशोर केदारी, शहाजी माळी, रामभाऊ सावंत, गणेश विपट, संजय देसाई, छबू लांडगे, औदुंबर तुपे, मंगला नायडू, सोनावणे सिस्टर, श्रीकांत मोने, सुधीर आफळे, गोविंद खवॉसखान आदी उपस्थित(Felicitation Program) होते.
यावेळी मनपा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन महापौर रवि लांडगे तसेच सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी (Felicitation Program) दिले.
तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असोसिएशनच्या कार्यालयासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर व उपमहापौर शर्मिला ताई बाबर यांनी (Felicitation Program) दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जवळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले. आभार दत्तात्रय फुगे यांनी(Felicitation Program) मानले.
