पिंपरी-चिंचवड : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशासह पिंपरी-चिंचवड शहरावरही शोककळा पसरली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंनी संगीत क्षेत्रात अजरामर ठसा उमटवला (Asha Bhosle Death) होता.
पिंपरी-चिंचवड शहराशी आणि येथील सांस्कृतिक चळवळीशी आशाताईंचे अत्यंत जवळचे नाते होते.पिंपरी चिंचवड मनपा विरोधी पक्षनेते, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी स्थापन केलेल्या ‘आर्ट्स सर्कल’च्या माध्यमातून त्यांनी अनेकदा शहराला भेट दिली होती. त्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमांनी शहरातील रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला(Asha Bhosle Death) होता.
‘पिंपरी-चिंचवड भूषण’ पुरस्काराने गौरव
भाऊसाहेब भोईर आणि आशा भोसले यांचे कौटुंबिक स्नेहसंबंधही घट्ट होते. भोईर यांच्या पुढाकारातून आशाताईंना ‘पिंपरी-चिंचवड भूषण’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्या आठवणींना उजाळा देताना भाऊसाहेब भोईर भावूक झाले. “आशाताईंच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक दैदिप्यमान पर्व संपले असून, हे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण (Asha Bhosle Death) केली.
शहराशी जुळलेले भावनिक नाते
आशाताईंनी पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक संगीत मैफिलींना उपस्थिती लावून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. शहरातील नवोदित कलाकारांसाठी त्या नेहमीच प्रेरणास्थान ठरल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना संगीत क्षेत्रात पुढे जाण्याची संधी (Asha Bhosle Death) मिळाली.
भाऊसाहेब भोईर यांनी आयोजित विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना आशाताईंनी मनापासून पाठिंबा दिला होता. त्यामुळे शहराशी त्यांचे एक भावनिक ऋणानुबंध निर्माण झाले (Asha Bhosle Death) होते.
सर्वत्र श्रद्धांजली
शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाप्रेमी आणि नागरिकांनी आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्या कायम रसिकांच्या हृदयात जिवंत राहतील, अशी भावना व्यक्त होत (Asha Bhosle Death) आहे.

