पिंपरी-चिंचवड : शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून देहूगाव येथील एका व्यक्तीची १७ लाख ८६ हजार १०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअॅप लिंक आणि बनावट ॲपच्या माध्यमातून हा जाळा विणला (Dehugaon Fraud)होता.
देहूगावातील व्यक्तीला शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून 17 लाख 86 हजार 100 रुपयांची ऑनलाइन फसवणूक. व्हॉट्सअॅप ग्रुप आणि बनावट ॲपच्या माध्यमातून सायबर गुन्हा.
याप्रकरणी पीडित व्यक्तीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतिमा बन्सल, प्रिया पाटील तसेच विविध बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला (Dehugaon Fraud)आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना ‘Dream Builders’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. त्यानंतर ‘Zanska Pro’ नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात(Dehugaon Fraud) आले.
आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादींनी २४ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान विविध बँक खात्यांमध्ये एकूण १७ लाख ८६ हजार १०० रुपये जमा केले. मात्र, परतावा मागितल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव (Dehugaon Fraud)घेतली.
पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत(Dehugaon Fraud) आहेत.
