पिंपरी-चिंचवड : चिंचवडमधील युवा खेळाडू चि. वरद विजय शेटे याने ७व्या आशियाई सवाते स्पर्धेत दमदार कामगिरी करत भारतासाठी कांस्यपदक पटकावले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले (Asian Savate Championship) आहे.
वरद हा एनपीआरएफ (NPRF) संस्थेचे सक्रिय सभासद विजयजी शेटे यांचा सुपुत्र असून, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचा गौरव वाढवला आहे. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर त्याने ही यशस्वी कामगिरी (Asian Savate Championship)साकारली.
या यशामागे चिंचवड येथील प्रशिक्षक राहुल पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली वरदने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदकावर आपले नाव (Asian Savate Championship) कोरले.

वरदच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात तो भारतासाठी सुवर्णपदक जिंकून आणेल, असा विश्वास व्यक्त केला जात (Asian Savate Championship) आहे.
