(पिंपरी प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडला असून इच्छुकांमध्ये अनिश्चितता, धाकधूक आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार (दि. २०) रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ही निवड होण्याची अपेक्षा होती; मात्र सभा तहकूब झाल्याने प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलण्यात (PCMC Corporaters)आली.
यापूर्वी १३ मार्च २०२६ रोजी झालेल्या सभेतही सत्ताधारी भाजपामध्ये सात नावांवर एकमत न झाल्याने हा विषय तहकूब करण्यात आला होता. त्यामुळे वारंवार होत असलेल्या विलंबामुळे स्वीकृत नगरसेवकांचा महत्त्वाचा कार्यकाळ वाया जात असल्याची टीका होत (PCMC Corporaters )आहे.
महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी तीन नावे निश्चित केली आहेत. त्यामध्ये माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सीमा साळवे आणि पदाधिकारी फजल शेख यांचा समावेश आहे. ही नावे ४ मार्च २०२६ रोजी निश्चित झाली असली, तरी त्यांना अद्याप सर्वसाधारण सभेची अधिकृत मंजुरी मिळालेली (PCMC Corporaters )नाही.
दुसरीकडे, भाजपामध्ये सात जागांसाठी तब्बल ३०० हून अधिक इच्छुक असल्याने स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध गट – आमदार समर्थक, निष्ठावंत कार्यकर्ते, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्ववादी संघटनांकडून सुचवण्यात आलेली नावे – यामध्ये समन्वय साधताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय प्रदेश समितीकडे सोपविण्यात आल्याची माहिती (PCMC Corporaters )आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने सुचवलेल्या नावांमध्ये बदल करण्यासाठी भाजपाकडून पडद्यामागे दबाव टाकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अंतिम निर्णय किंवा तडजोड होईपर्यंत भाजपाची सात नावे जाहीर केली जाणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे (PCMC Corporaters )आहे.
शेजारच्या पुणे महापालिकेत ९ मार्च २०२६ रोजीच स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर होऊन निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप तिढा कायम असल्याने निवड प्रक्रियेला विलंब होत (PCMC Corporaters )आहे.
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सात नावांवर एकमत झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे या सभेत निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र सभा तहकूब झाल्याने प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. आता ५ मे रोजी होणाऱ्या पुढील सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले(PCMC Corporaters ) आहे.
याशिवाय, महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी अध्यक्षांची निवड लवकरच करण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरसचिव मुकेश कोळप यांनी (PCMC Corporaters )दिली.
एकूणच, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीतील सततच्या विलंबामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली असून महापालिकेतील राजकीय तणाव अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत (PCMC Corporaters )आहे.
