पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रवेश-प्रतिप्रवेशाच्या राजकारणाला वेग आला असताना, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. आकुर्डी–काळभोरनगर प्रभागातील प्रभावशाली शेट्टी कुटुंबीयांनी राष्ट्रवादीची साथ सोडून आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला (Bjp Entry Pcmc Landge ) आहे.
शहरातील हॉटेल व्यावसायिक संघटनेत सक्रिय असलेले आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन ते चार टर्म नगरसेवक म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेले उल्हास शेट्टी आणि प्रसाद शेट्टी यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. शेट्टी कुटुंबीयांचे बंधू जगदीश शेट्टी हे राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील प्रस्थ असून, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले(Bjp Entry Pcmc Landge ) जातात.
याचबरोबर दिवंगत खासदार गजानन बाबर यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, अमित प्रकाश बाबर आणि ऐश्वर्या बाबर यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अमित बाबर हे माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांचे सुपुत्र असून, सांगली–सातारा–कोल्हापूर मित्र मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले (Bjp Entry Pcmc Landge )आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, दक्षिण भारत आघाडीचे प्रमुख राजेश पिल्ले, सरचिटणीस शितल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्यासह राजु मिसाळ, प्रशांत शितोळे, शांतराम बापू भालेकर, राजु दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास गोफणे, अमित बाबर, महेश सहकारी बँकेचे अजय लढ्ढा, महेश काटे, संजय जगताप, लवकुश यादव, चेतन शेटे, गणेश कंकावणे, ऋषी शेट्टी यांच्या प्रवेशामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले (𝘉𝘫𝘱 𝘗𝘤𝘮𝘤 𝘌𝘯𝘵𝘳𝘺 𝘓𝘢𝘯𝘥𝘨𝘦)आहे.
दरम्यान, मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत चिंचवडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनीही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कलाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा असताना त्यांनी भाजपाची वाट निवडल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे.
या सर्व घडामोडींवर भाष्य करताना आमदार महेश लांडगे यांनी, “शहरातील निर्णय शहरातच घेतले जातात,” हे पुन्हा एकदा अधोरेखित (Bjp Entry Pcmc Landge ) केले.
ते पुढे म्हणाले,
“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शतप्रतिशत भाजपा’चा ठाम संकल्प आम्ही केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश करीत आहेत. सर्वजण एकत्र येऊन पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी कार्य करणार आहोत,” असेही आमदार लांडगे यांनी स्पष्ट (Bjp Entry Pcmc Landge ) केले.
