पिंपरी, दि. १८ एप्रिल २०२६ — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ताधारकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या या योजनेंतर्गत नागरिकांना एकूण १६ प्रकारच्या सवलतींचा लाभ मिळणार (Property Tax Discount) आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरावा, असे आवाहन करण्यात आले (Property Tax Discount)आहे.
वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांना चालू वर्षाच्या सामान्य करावर ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन माध्यमातून कर भरल्यास अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली (Property Tax Discount)आहे.
महिलांच्या नावावर असलेल्या एका निवासी मालमत्तेच्या सामान्य करावर तब्बल ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या एका मालमत्तेवर ५० टक्के सवलत, तसेच स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावरील एका मालमत्तेवरही ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली (Property Tax Discount)आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट संकल्पना, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि सौर ऊर्जा यांसारख्या उपक्रमांवरही विविध करसवलती देण्यात आल्या (Property Tax Discount)आहेत.
महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना वेळेत कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. उपायुक्त सचिन पवार यांनीही करदात्यांनी निश्चित कालावधीत कर भरून योजनांचा लाभ घ्यावा, असे (Property Tax Discount)सांगितले.
महापालिकेच्या रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व इतर नागरी सेवांसाठी कर संकलन महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले (Property Tax Discount) आहे.
