पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला असून सहसचिव सुभाष उसरणीकर यांच्या स्वाक्षरीने हा आदेश प्रसिद्ध करण्यात आला (PCMC New Commissioner) आहे.
या आदेशानुसार सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून काम पाहत असलेले श्रावण हर्डीकर यांना कार्यमुक्त करण्यात आले (PCMC New Commissioner)आहे.
शासनाच्या निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सोपवून नव्या पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाची प्रत संबंधित विभागांना पाठविण्यात आली असून बदलीनंतर प्रशासनिक कामकाज सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले (PCMC New Commissioner)आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाल्याने शहरातील प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात (PCMC New Commissioner) आहे.
