(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महापालिकेच्या दहा प्रभाग समिती अध्यक्षांची बैठक महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या दालनात पार पडली. आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमाताई खापरे आणि अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत नवनियुक्त प्रभाग अध्यक्षांना विकासकामांच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात (Abhishek Barne)आल्या.
अभिषेक बारणे यांनी प्रभाग अध्यक्षांनी पहिल्या आठवड्यात प्रभागाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी, स्वच्छता, नाले, अतिक्रमण तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक प्रभागात हॉकर झोन, पे-अँड-पार्क, नागरिक सुविधा केंद्र, आधार सेवा आणि एक खिडकी योजना प्रभावीपणे राबविण्यावरही भर देण्यात (Abhishek Barne)आला.
याशिवाय महापालिकेची रुग्णालये व शाळांची पाहणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल पुनर्भरण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शहराच्या विकासाची ध्येयधोरणे प्रभावीपणे राबवून लोकहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रभाग अध्यक्षांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन बारणे यांनी (Abhishek Barne)केले.



