(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून) : जालना येथे झालेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेनंतर १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल २१ खेळाडूंना स्थान मिळाले असून, शहरासाठी ही अभिमानाची बाब ठरली (Silambam Championship) आहे.
भारतीय संघात आदर्श केकंड, आदित्य टेळेकर, आनंद गायकवाड, अनन्या हेलावे, अथर्व कर्हाडे, देवराज भुटेकर, हर्षल धाने, काशिनाथ हेवळे, प्रिया सैनी, राज वायकोळे, ऋतुजा कुलकर्णी, साक्षी सैनी, श्रेया दांडे, सिद्धार्थ चौधरी, सूरज बांगर, सूरज टाळेकर, वैदेही नवले, वेदांत तापकीर, विश्वजीत पवार, यश बलगुडे आणि संजय बनसोडे यांची निवड झाली (Silambam Championship)आहे.
सिलंबम या पारंपरिक भारतीय युद्धकलेत राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळविले आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हे खेळाडू देशाचे आणि पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात (Silambam Championship) आहे.

महापौर रवि लांडगे यांनी भारतीय संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत, त्यांच्या मेहनत, शिस्त आणि समर्पणाचे कौतुक केले. मलेशियातील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भारताचा तिरंगा उंचावावा, अशा शुभेच्छाही त्यांनी (Silambam Championship) दिल्या.
