प्रतिनिधी :चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ब्रिजवर मंगळवारी (दि. ५ मे) पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दुभाजकाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (Chinchwad Accident) झाला.
आदित्य बसलिंगप्पा मिटी (वय २९, रा. हडपसर, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास आदित्य एम्पायर इस्टेट ब्रिजवरून आपल्या दुचाकीवरून जात असताना, वाहनाचा वेग प्रचंड असल्याने एम्पायर इस्टेट वसाहतीजवळ त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकाला जाऊन(Chinchwad Accident) धडकली.
धडक इतकी भीषण होती की आदित्य गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू(Chinchwad Accident) झाला.
अपघातानंतर पुलावर रक्ताचा सडा पडल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे इतर वाहनचालकांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी पाण्याचा मारा करून रस्ता स्वच्छ (Chinchwad Accident) केला.
घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत. भरधाव वेग पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत (Chinchwad Accident) आहे.
