चिंचवड – अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ साहित्यिका सौ. प्रज्ञा घोडके यांना ‘साहित्यरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या समारंभाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे संस्थेतर्फे सन्मानचिन्ह, मानपत्र आणि गौरववस्त्र कुरिअरद्वारे त्यांच्या निवासस्थानी पाठविण्यात (Sahitya Ratna Award) आले.
यावेळी अभिनंदनपर भेटीदरम्यान प्रतिनिधीशी बोलताना सौ. घोडके यांनी आपल्या साहित्यप्रवासाबाबत सांगितले की, त्यांना लेखन-वाचनाची आवड इयत्ता आठवीपासूनच होती. मात्र १९८७-८८ पासून विविध दैनिकांमधून लेख, कविता आणि कथा प्रसिद्ध होऊ लागल्याने साहित्य क्षेत्रातील आवड अधिक दृढ (Sahitya Ratna Award) झाली.
वयाच्या २२ व्या वर्षी त्यांचा एस.टी.चा भीषण अपघात झाला. या अपघातातून त्यांनी मृत्यूला हरवले, मात्र त्यात त्यांचा डावा डोळा गमवावा लागला. तसेच वयाच्या ३८ व्या वर्षापासून कमरेच्या मणक्याच्या त्रासामुळे असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. कमरेवर दोन शस्त्रक्रिया होऊनही आजही उपचार सुरू आहेत. या वेदनांवर मात करण्यासाठी त्यांनी साहित्याच्या छंदात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या मते, स्वसृजनातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय (Sahitya Ratna Award)असतो.
पुढे त्या विविध नोंदणीकृत साहित्यिक संस्थांशी जोडल्या गेल्या आणि ऑनलाइन साहित्यस्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागल्या. विविध विषयांवर लेखन करताना त्यातून त्यांच्या लेखनाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली. अवघ्या नऊ वर्षांच्या कालावधीत त्यांनी नऊ साहित्यिक कृती प्रकाशित केल्या असून त्यात आठ काव्यसंग्रह आणि एक लघुकथा व लेखसंग्रहाचा समावेश (Sahitya Ratna Award)आहे.
पुरस्कारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, आजच्या काळात पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट नसली तरी काही ठिकाणी पैसे देऊन पुरस्कार दिले जातात आणि प्रसिद्धीसाठी काही जण ते स्वीकारतात, हे पाहून आश्चर्य वाटते. स्वतःच्या पैशाने पुरस्कार घेणे म्हणजे स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्यासारखे आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या दृष्टीने स्वसृजनाचा आनंद हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मौल्यवान (Sahitya Ratna Award)आहे.
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई ही शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पारमार्थिक विषयांवर काम करणारी संस्था असून साहित्यिकांना योग्य मार्गदर्शन देत असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या चार वर्षांपासून त्या या संस्थेशी काव्यस्पर्धांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. या काळात त्यांना ‘काव्यगौरव’पासून ‘साहित्यरत्न’पर्यंत सलग चार राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाले (Sahitya Ratna Award)आहेत.
पुढेही साहित्य क्षेत्रात सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त करताना सौ. घोडके म्हणाल्या की, हे कार्य केवळ पुरस्कारांसाठी नसून स्वसृजनाच्या आनंदासाठीच सुरू राहील. या सन्मानासाठी त्यांनी अष्टपैलू संस्कृती कला अकादमीचे आयोजक, परीक्षक आणि सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार (Sahitya Ratna Award)मानले.
