(पिंपरी, ता. ८, रो. राजेश अगरवाल ) : चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व गावांचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करावीत, अशी मागणी होत आहे. या परिसरातील वाढते औद्योगिकीकरण, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नागरी सुविधांच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले (Chakan MIDC)आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नियमित स्वच्छता, अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण तसेच उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव आणि नाट्यगृहांसारख्या सार्वजनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. शहराच्या औद्योगिक परिसरातही विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून विकासकामे करण्यात आली (Chakan MIDC)आहेत.
त्याउलट चाकण परिसरात ग्रामपंचायत, पीएमआरडीए, एमआयडीसी, जिल्हा परिषद आणि नगरपरिषद अशा विविध यंत्रणांच्या कार्यक्षेत्रांमुळे विकासकामांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यांसारख्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची आवश्यकता (Chakan MIDC)आहे.
चाकण एमआयडीसी परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नागरिकसंख्या आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि इतर नागरी सुविधांचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी समस्यांच्या मुळावर काम करण्याची गरज (Chakan MIDC)आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर चाकण एमआयडीसी परिसरातील गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश झाल्यास या भागाच्या विकासाला गती मिळू शकते, असा दावा करण्यात आला (Chakan MIDC)आहे.
चाकण परिसरातील आमदार, खासदार, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच इतर लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. औद्योगिक विकासासोबत नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळण्यासाठी चाकण परिसराच्या प्रशासकीय रचनेबाबत दीर्घकालीन निर्णय घेण्याची आवश्यकता (Chakan MIDC)आहे.




