प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरात आज सकाळी MH12 XT 0146 या क्रमांकाचे एक वाहन आढळून आले. या वाहनावर “POLICE” तसेच “पुणे महानगरपालिका” अशी दोन्ही नावे लिहिलेली दिसून आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला (Dapodi Police Vehicle) आहे.
सामान्यतः पोलिस विभागाच्या वाहनांवर केवळ पोलिस विभागाचे नाव किंवा ओळख दर्शविणारे चिन्ह असते. मात्र या वाहनावर पोलिसांसोबतच महानगरपालिकेचे नावही नमूद असल्याने नेमके हे वाहन कोणत्या विभागाचे आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात (Dapodi Police Vehicle)आहे.
या संदर्भात पोलिस विभाग, महानगरपालिका तसेच आरटीओ यांच्याकडे अधिकृत स्पष्टीकरण मागण्यात आले(Dapodi Police Vehicle) आहे.
सीनियर सिटिजन, शीख समाजाचे नागरिक तसेच आरटीआय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सरदार रविंदर सिंह यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागांनी याबाबत स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली (Dapodi Police Vehicle) आहे.
या घटनेचे जीपीएस लोकेशनसह फोटो पुरावे देखील संबंधित विभागांकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली(Dapodi Police Vehicle) आहे.
