पिंपरी-चिंचवड : निगडी वसाहत परिसरात जुन्या वादातून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्यांच्या मित्रालाही आरोपींनी जखमी केले (Nigdi Crime News)आहे.
याप्रकरणी प्रसाद नंदकुमार बहुले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी विवेक ऊर्फ विकी विनोद सोनकांबळे, जुबेर नासीर शेख, श्रवण ऊर्फ सुरज शाहजी कुऱ्हाडे आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यातील विवेक सोनकांबळे आणि जुबेर शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू (Nigdi Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून फिर्यादीला गाठले. “तुला जिवंत सोडत नाही,” अशी धमकी देत त्यांनी हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी(Nigdi Crime News) झाले.
दरम्यान, फिर्यादीला वाचवण्यासाठी आलेल्या किरण काळे यांच्या हातावरही आरोपींनी कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपींनी हवेत शस्त्रे फिरवत “आम्ही येथील भाई आहोत” असे ओरडत परिसरात दहशत निर्माण (Nigdi Crime News)केली.
घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू (Nigdi Crime News) आहे.
