(प्रतिनिधी :पिंपरी, दि. १८ जून २०२६ ): पद्मश्री नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून मराठी भाषेला बळ देत तिला शुद्ध आणि समृद्ध केले, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी (Padmashree Narayan Surve) केले.
पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला. यावेळी अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, डॉ. पांडुरंग भोसले, शाहीर आसराम कसबे, महेंद्र भारती आणि प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता घोडे उपस्थित(Padmashree Narayan Surve) होते.
यावेळी छाया कांकरिया यांना ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान’, दत्तात्रय अत्रे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार’, कवयित्री जयश्री श्रीखंडे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान’, तर कवी शिवाजी शिंदे आणि कवयित्री प्राजक्ता पटवर्धन यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात(Padmashree Narayan Surve) आले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून साम्यवादाची विचारधारा मांडली. वैदिक आणि अवैदिक विचारधारांनी भारतीय संस्कृतीला संविधानात्मक चेहरा दिला असून विविध विचारांच्या समन्वयातून लोकशाही अधिक प्रगल्भ होत असते. पंडित नेहरू अधिक नरेंद्र मोदी म्हणजे आजची भारतीय लोकशाही (Padmashree Narayan Surve) आहे.”
सत्काराला उत्तर देताना पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, “बालपणात महापुरुषांची चरित्रे वाचताना सुखासीन आयुष्यापेक्षा समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. नारायण सुर्वे यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य लाभले. अण्णाभाऊ साठे आणि नारायण सुर्वे यांनी मराठीला सरस्वतीचे वाण(Padmashree Narayan Surve) दिले.”
प्राची पटेकर हिच्या हस्ते वृक्षपूजन, सुभाष चव्हाण यांच्या शंखवादनाने आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी सादर केलेल्या नारायण सुर्वे लिखित ‘डोंगरी शेत माझं गं…’ या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात (Padmashree Narayan Surve) झाली.
प्रास्ताविकात सुदाम भोरे यांनी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे’ या विषयावर सुर्वे यांच्या जीवनकार्याचा आढावा(Padmashree Narayan Surve) घेतला.
यानंतर झालेल्या ‘नारायण सुर्वे काव्यजागर’ कविसंमेलनात पुरस्कारार्थी कवींसह संगीता झिंजुरके, प्रभाकर वाघोले तसेच भूमिका खंडागळे, रूपाली तायड, अंकिता धिवार, केतन सांगडे आणि सोनल धिवार या विद्यार्थ्यांनी कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. मानसी चिटणीस यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले, तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी संवाद(Padmashree Narayan Surve) साधला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, सीताराम नरके, प्रा. प्रभाकर दाभाडे, राजू जाधव, स्वाती भोसले, प्रदीप गांधलीकर तसेच खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले, तर अरुण गराडे यांनी आभार (Padmashree Narayan Surve) मानले.
