(सांगवी ):जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवाचा आनंद शोकांतिकेत बदलला. दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान उतरवित असताना ती अचानक कोसळून अंगावर पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (४ सप्टेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवीतील लेन क्रमांक दोन येथे घडली.सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे मृत महिलेचे नाव (Sangvi Dahi Handi)आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर घडली दुर्घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील ‘विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळा’च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सुमारे १० वाजून ५ मिनिटांनी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर स्टेज आणि त्यासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा उतरविण्याचे काम सुरू (Sangvi Dahi Handi)होते.
सलमा पठाण या पती सलाउद्दीन पठाण यांच्यासोबत दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर पतीने घरी जाण्यासाठी त्यांना आवाज दिला. त्या पतीच्या दिशेने जात असतानाच स्टेजची लोखंडी कमान उतरविताना अचानक त्यांच्या अंगावर (Sangvi Dahi Handi)कोसळली.
या दुर्घटनेत सलमा पठाण गंभीर जखमी झाल्या. उपस्थित नागरिक आणि नातेवाइकांनी त्यांना तातडीने औंध येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित(Sangvi Dahi Handi) केले.
कुटुंबीयांकडून तक्रार देण्यास नकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सलमा पठाण यांचा मुलगा संबंधित ‘विघ्नहर्ता दहीहंडी मंडळा’चा कार्यकर्ता आहे. मंडळातील इतर तरुण अडचणीत येऊ नयेत, या भावनेतून पती, मुलगा आणि नातेवाइकांनी मंडळाविरोधात अधिकृत तक्रार देण्यास नकार दिला (Sangvi Dahi Handi)आहे.
सुरक्षेच्या उपाययोजनांची पोलिसांकडून तपासणी
या घटनेप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे. लोखंडी कमान उतरविताना आवश्यक ती सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली होती का, तसेच या दुर्घटनेमागे कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
तपासातून निष्पन्न होणाऱ्या बाबींनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी (Sangvi Dahi Handi)दिली.
दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलेचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत (Sangvi Dahi Handi)आहे.
