(साप्ताहिक सदर ):दोन वर्षांपूर्वी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या प्रदीर्घ, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण चित्रपट कारकिर्दीचा मागोवा घेण्याचा हा(Wahida Raheman) प्रयत्न.
१९३८ मध्ये जन्मलेल्या वहिदा रेहमान यांना अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. १९५६ साली प्रदर्शित झालेल्या सी.आय.डी. या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रहस्यमय कथानक, वेगवान मांडणी आणि ओ. पी. नय्यर यांच्या नशिल्या संगीतामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात त्या उपनायिकेच्या भूमिकेत असल्या, तरी आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि सहज अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. “कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…” हे त्यांच्यावर चित्रित झालेले गीत आजही लोकप्रिय (Wahida Raheman) आहे.
शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतलेल्या वहिदा रेहमान यांनी त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक सरस चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. जवळपास सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत यशस्वी कारकीर्द घडवली. आज ८८ व्या वर्षीही त्या निरोगी आणि तंदुरुस्त आहेत. त्यांच्या उत्तम प्रकृतीमागे कथ्थक नृत्यामुळे मिळालेला नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे महत्त्वाचे कारण असावे, असे वाटते. कथ्थकमध्ये प्राविण्य मिळवलेल्या आशा पारेख, वैजयंतीमाला आणि हेमामालिनी याही आज उत्तम आरोग्य लाभलेल्या अभिनेत्री आहेत. नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे महत्त्व त्यांच्या आयुष्याकडे पाहून अधोरेखित(Wahida Raheman) होते.
चौदहवीं का चाँदपासून गुरुदत्त आणि वहिदा रेहमान यांची गाजलेली जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्यासा, कागज के फूल आणि साहेब बीबी और गुलाम यांसारख्या अजरामर चित्रपटांत त्यांनी गुरुदत्त यांच्यासोबत अविस्मरणीय भूमिका साकारल्या. “चौदहवीं का चाँद हो या आफताब हो…” हे साहिर लुधियानवी यांनी लिहिलेले, रवी यांच्या संगीताने सजलेले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत जणू त्यांच्या सौंदर्याचेच वर्णन करणारे (Wahida Raheman) ठरले.
कृष्णधवल चित्रपटांच्या सुवर्णकाळात वहिदा रेहमान यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. लता मंगेशकर यांच्या कोमल स्वरांनी सजलेले बीस साल बादमधील “सपने सुहाने लड़कपन के…” आणि कोहरामधील “ओ बेकरार दिल…” ही गीते आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात. बीस साल बाद, कोहरा आणि वो कौन थी हे साठच्या दशकातील गूढ आणि रहस्यप्रधान चित्रपट विशेष गाजले. बीस साल बाद आणि कोहरामध्ये वहिदा रेहमान यांनी विश्वजीत यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारल्या. दोन्ही चित्रपटांना हेमंत कुमार यांचे अप्रतिम संगीत लाभले(Wahida Raheman) होते.
“कहीं दीप जले कहीं दिल…”, “झूम झूम ढलती रात…” यांसारखी गीते चित्रपट पाहताना अंगावर रोमांच उभे करत. सुंदर संगीत आणि रहस्यमय वातावरण यांचा अप्रतिम संगम या चित्रपटांत अनुभवायला मिळत (Wahida Raheman) असे.
वहिदा रेहमान यांनी गुरुदत्त, देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर आणि विश्वजीत यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. पुढे सुनील दत्त, राजेंद्र कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, मनोज कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांनी यशस्वी भूमिका साकारल्या. अनेक पिढ्यांतील अभिनेत्यांसोबत सहज जुळवून घेत आपले सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्त्व दीर्घकाळ टिकवून ठेवणे ही त्यांची मोठी जमेची बाजू (Wahida Raheman) ठरली.
सोलवा सालमध्ये देव आनंद यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली. “है अपना दिल तो आवारा…” हे हेमंत कुमार यांच्या स्वरातील गीत आजही रसिकांच्या ओठांवर आहे. देव आनंद यांच्या नवकेतन संस्थेच्या चित्रपटांत वहिदा रेहमान या आवडत्या नायिका बनल्या. काला बाजारमधील “रिमझिम के तराने लेके आई बरसात…” हे गीत त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर घालणारे (Wahida Raheman) ठरले.
वहिदा रेहमान यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही अंगप्रदर्शनाचा आधार घेतला नाही. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, सोज्वळ व्यक्तिमत्त्वाने आणि नृत्यकौशल्याने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तीसरी कसममधील “आ आ भी जा…”, मुझे जीने दोमधील “रात भी है कुछ भीगी भीगी…”, प्यासामधील “जाने क्या तूने कही…”, साहेब बीबी और गुलाममधील “भँवरा बड़ा नादान है…” आणि कागज के फूलमधील “वक्त ने किया क्या हसीं सितम…” यांसारखी गीते त्यांच्या अभिनयामुळे अधिकच अजरामर (Wahida Raheman) झाली.
“पान खाए सैयाँ हमारो…” या गाण्यातील त्यांची अदाकारी असो किंवा विविध भावछटांनी नटलेल्या भूमिका असोत, प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. उत्तम नृत्यांगना, समर्थ अभिनेत्री, सोज्वळ व्यक्तिमत्त्व आणि कोणत्याही दिग्गज अभिनेत्यासोबत सहज वावरण्याची क्षमता यामुळे वहिदा रेहमान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण(Wahida Raheman) केले.
आजही त्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत, सन्मानाने आणि समाधानाने आयुष्य जगत आहेत. त्यांच्या पन्नास-साठ वर्षांच्या प्रदीर्घ चित्रपट प्रवासाचा संपूर्ण आढावा एका भागात घेणे अशक्य (Wahida Raheman) आहे.
पुढील भागात गाईडपासून त्रिशूलपर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णपानांचा वेध (Wahida Raheman) घेऊ.

भेटूया पुढच्या आठवड्यात… पुन्हा एकदा शुक्रवारी, फर्स्ट डे… फर्स्ट (Wahida Raheman)शो !
– सुरेश कंक

