प्रतिनिधी :पुण्यातील चिखली परिसरात गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने एका नागरिकाची तब्बल १ लाख ५८ हजार ८०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचा बनावट संदेश पाठवून सायबर चोरट्यांनी संबंधित व्यक्तीचा मोबाईल हॅक करत मोठी रक्कम लंपास (Cyber fraud) केली.
याप्रकरणी एका नागरिकाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात सायबर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नेवाळे वस्ती परिसरातील फिर्यादीच्या राहत्या घरी (Cyber fraud) घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर ‘एमएनजीएल गॅस कनेक्शन बंद होणार’ असल्याचा मेसेज आला होता. तसेच थकीत गॅस बिल तातडीने भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. या संदेशासोबत ‘BIN MNGL BILL UPDATE’ नावाची फाईल पाठवण्यात आली (Cyber fraud) होती.
फिर्यादीने संबंधित फाईलवर क्लिक करून १२ रुपयांचे कथित थकीत बिल भरण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्डची माहिती भरली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्डमधून विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे तब्बल १ लाख ५८ हजार ८०० रुपये परस्पर ट्रान्सफर केल्याचे समोर (Cyber fraud) आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकाने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करत (Cyber fraud )आहेत.
