प्रतिनिधी :चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या “कॅलिस्टा इंडिया २०२६” आणि “कॅलिस्टा मिस, मिसेस महाराष्ट्र २०२६” या बहुचर्चित सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत जळगावच्या वैष्णवी शिंपी हिने आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर “कॅलिस्टा इंडिया २०२६”चा मानाचा मुकुट पटकावला. तिला आकर्षक मुकुटासह रोख २० हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात (Calista India 2026)आले.
चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉलमध्ये कॅलिस्टा पेजंट्सतर्फे आयोजित या स्पर्धेत देशभरातील ३३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम उपविजेतेपद पश्चिम बंगालच्या काजल सोनकर हिला मिळाले. तिला मुकुटासह १७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. द्वितीय उपविजेतेपद रायगडच्या जागृती गाणवे आणि पुण्याच्या वृषाली अजोटीकर यांनी संयुक्तपणे पटकावले. त्यांना प्रत्येकी मुकुट आणि १५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात (Calista India 2026)आले.
ऑनलाईन कॅलिस्टा इंडिया २०२६मध्ये डॉ. स्नेहल नारखेडे पोल, प्रियांका झाडे आणि अनिता महापुरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच ऑनलाईन कॅलिस्टा महाराष्ट्र २०२६ विजेत्या अंजना गावले आणि डॉ. सुषमा सोनवणे यांनाही सन्मानित करण्यात (Calista India 2026)आले.
स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सोनेरी नथ, पैठणी साडी, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास कॅलिस्टा पेजंट्सचे कार्यकारी संचालक संजीव जोग, विविध क्षेत्रातील मान्यवर, परीक्षक आणि फॅशन विश्वातील प्रतिनिधी उपस्थित(Calista India 2026) होते.
