निगडी :ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे आज १४व्या शिक्षक–पालक क्रीडा स्पर्धेची मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरुवात झाली. शालेय क्रीडा संस्कृतीला चालना देणाऱ्या या महोत्सवात ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाहक महेंद्र सेठीया हे मुख्य अभ्यागत म्हणून उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष स्फूर्ती( JNPV League)लाभली.
उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर केंद्र प्रमुख मनोज देवळेकर, क्रीडा महोत्सव सहकार्यवाहक आबासाहेब बारमुख, अध्यक्ष सागर कलाटे, अमोल पुंडे, महिला अध्यक्ष स्मिता गांगुर्डे, आदित्य शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात(JNPV League) आले.
यावेळी मुख्य अभ्यागत महेंद्र सेठीया यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवादासाठी क्रीडा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. “क्रीडा हे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर संघभावना, शिस्त, सकारात्मक स्पर्धा आणि मूल्यशिक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. शिक्षक आणि पालक एकत्र मैदानात उतरतात, तेव्हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण होतो,” असे त्यांनी नमूद केले. ज्ञानप्रबोधिनीने वर्षानुवर्षे जो सर्वांगीण शिक्षणाचा ध्यास घेतला आहे, त्यात क्रीडेला दिलेले महत्त्व कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी (JNPV League)सांगितले.
पालक महासंघाच्या वतीने पंकज चापोलीकर यांनी मनोगत व्यक्त करत क्रीडा महोत्सवाची संकल्पना, उद्दिष्टे आणि विविध स्पर्धांची माहिती थोडक्यात मांडली. या महोत्सवातून शिक्षक–पालक–विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी (JNPV League)अधोरेखित केले.
कार्यक्रमात विद्याताई उधास यांनी उपस्थित पालकांना क्रीडा व आरोग्यविषयक प्रतिज्ञा घ्यायला लावली. यामुळे क्रीडा महोत्सवाला मूल्याधिष्ठित आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त (JNPV League)झाले.
शालेय मैदानात विविध क्रीडा प्रकारांसाठी रंगलेला उत्साह, सहभागी शिक्षक व पालकांची ऊर्जा आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला. या १४व्या शिक्षक–पालक क्रीडा स्पर्धेमुळे ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची परंपरा अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून(JNPV League )आले.
आजच्या पहिल्या दिवशी व्हॉलीबॉल आणि क्रिकेट च्या सांघिक खेळाने स्पर्धेची सुरुवात झाली असून पुढील दोन आठवडे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी या स्पर्धा अशाच जोमाने खेळल्या जातील असे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात (JNPV League) आले
