पिंपरी :स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रम उत्साहात पार पडत असताना काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गीत सुरू असताना ते थांबविण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने पिंपरी-मोरवाडी येथे निषेध आंदोलन करण्यात (BJP Yuva Morcha)आले.
भाजयुमोचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम्’चे गायन करून राष्ट्रगीताप्रती आदर व्यक्त (BJP Yuva Morcha)केला.
‘वंदे मातरम्’ हे भारतीयांच्या राष्ट्रप्रेमाचे, स्वाभिमानाचे आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. त्याचा कोणत्याही प्रकारे अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. तसेच या प्रकरणी काँग्रेस पक्षाने देशवासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात (BJP Yuva Morcha)आली.
या आंदोलनाला संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, मुख्य प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाता पालांडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अजित कुलथे, तेजस्विनी दुर्गे, शहर भाजपाचे दिलीप राऊत, कैलास सानप, खेमराज काळे, सतपाल गोयल, प्रदीप महाजन, धर्म वाघमारे, सतीश बाराहाते, सुनील वाघे, संभाजी नाईकनवरे, शंकर लोंढे, अभिजित वाघमारे, अमोल ढोबळे, दिनेश काटे, प्रसाद कस्पटे, राजेश डोंगरे, अमित देशमुख, मयूर काळभोर, अतुल काळोखे, मनोज घोडेकर, मनोज माळी, अजिंक्य गोळे, आदम मुलानी, जगदीश येवले, जालिंदर काटे, प्रदीप नाईक, अभिजीत बागुल, प्रतीक रामगुडे, आदित्य कुलकर्णी, साईराज भालेकर, ओमकार पवार, दिपराज गुप्ता आणि सचिन उदागे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित(BJP Yuva Morcha) होते.
