पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : भाषा, संस्कृती, अर्थकारण आणि समाजकारण या क्षेत्रांतील आदर्शांचा शोध घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास भारत ‘विश्वगुरू’ पदाकडे वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यांनी (Jijau Vyakhyanmala) केले.
चिंचवडगाव येथील चापेकर स्मारक उद्यानात गांधीपेठ तालीम मित्रमंडळ व अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिजाऊ व्याख्यानमाला’तील ‘आदर्शांच्या शोधात’ या विषयावरील चौथ्या पुष्पात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती(Jijau Vyakhyanmala) होती.
देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या चरित्रातून जगभरातील अनेकांनी प्रेरणा घेतल्याचे सांगितले. तसेच समाजात सकारात्मक दृष्टी ठेवून आदर्श व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त(Jijau Vyakhyanmala) केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम शिंदे यांनी केले तर सुहास पोफळे यांनी आभार(Jijau Vyakhyanmala) मानले.
