आळंदी :आळंदी देवाची येथील इंद्रायणी नगर परिसरात सहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला (Alandi Crime News) आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जुलै २०२६ ते ८ ऑगस्टदरम्यान आरोपीने मुलाला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद(Alandi Crime News) आहे.
पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२ ऑगस्ट रोजी पहाटे दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगारे करीत (Alandi Crime News) आहेत.



