(प्रतिनिधी पिंपरी, दि. २५ जून) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित मेट्रो विस्तार, जलनिस्सारण व्यवस्था, अग्निसुरक्षा, आरोग्य सेवा, रस्ते, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि नागरी सुविधांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित (Pcmc Standing Committee)होते.
बैठकीत महा-मेट्रोतर्फे राबविण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो फेज-१ विस्तार प्रकल्पांतर्गत पिंपरी-निगडी मार्गावरील अतिरिक्त चौथ्या मेट्रो स्थानकासाठी महापालिकेच्या आर्थिक हिस्स्यास मंजुरी देण्यात आली. तसेच दिघी, बोपखेल, दापोडी परिसरातील जलनिस्सारण व्यवस्था मजबूत करणे, मामुर्डी येथील साईनगर जलक्षेत्रात नवीन जलवाहिनी टाकणे आणि पुनावळे येथील अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी सुधारित खर्चालाही मान्यता देण्यात (Pcmc Standing Committee)आली.
याशिवाय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मान्यतेसाठी आवश्यक शुल्क, सोनोग्राफी यंत्रणेची देखभाल, महापालिका शाळांच्या दुरुस्तीची कामे, कोयनानगर व सीडीसी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, मुख्य प्रशासकीय इमारतीचे स्ट्रक्चरल दुरुस्ती काम, सभागृहाचे नूतनीकरण तसेच अर्बन स्ट्रीट डिझाईनअंतर्गत विकसित सुविधांच्या देखभालीस मंजुरी देण्यात (Pcmc Standing Committee)आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-आळंदी रस्त्यावरील पावसाळी वाहिन्या व गटारांची साफसफाई, क्रीडा साहित्य खरेदी, ‘अभिव्यक्ती कलामहोत्सव’ आयोजन, डेंग्यू प्रतिबंधासाठी औष्णिक धुरीकरण वाहनसेवा, भोसरीतील शांतीनगर सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीसाठी रोहिणी महिला बचत गटाला मुदतवाढ तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागासाठी गॅस डिटेक्टर खरेदीलाही मंजुरी देण्यात (Pcmc Standing Committee)आली.
यावेळी अभिषेक बारणे म्हणाले, “शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो विस्तार, जलनिस्सारण, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा, रस्ते विकास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेली विकासकामे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास महत्त्वपूर्ण (Pcmc Standing Committee)ठरतील.”

