पिंपरी-चिंचवड : महापालिकेकडून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अतिरिक्त १ कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावावरून शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला सकारात्मक शिफारस केली असून अंतिम मंजुरीसाठी तो महापालिका सभेकडे पाठविण्यात आला (Yashvantrav Smarak) आहे.
यशवंतराव चव्हाण स्मारक समितीची स्थापना १९८९ मध्ये झाली. त्यानंतर १९९२ मध्ये निगडी प्राधिकरण परिसरातील ४४ गुंठे जागेवर स्मारक उभारण्यात आले. या ठिकाणी ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, सांस्कृतिक भवन, वैद्यकीय केंद्र तसेच विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र अशा विविध सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध (Yashvantrav Smarak)आहेत.
महापालिकेकडून यापूर्वी २०१८-२१, २०२२-२३ आणि २०२४-२५ या कालावधीत प्रत्येकी ५ कोटी रुपये, असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी स्मारकासाठी देण्यात आला होता. या निधीतून स्मारकाची इमारत आणि इतर विकासकामे पूर्ण करण्यात आली (Yashvantrav Smarak) आहेत.

दरम्यान, स्मारक परिसरात १४० kWp क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणे आणि आवश्यक फर्निचर उपलब्ध करून देण्यासाठी समितीने अतिरिक्त १ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. मात्र, यापूर्वी भविष्यात कोणतीही शासकीय मदत मागणार नसल्याचे हमीपत्र समितीकडून देण्यात आले होते. त्यामुळे त्या अटीतून सूट देण्याचा प्रस्ताव आता चर्चेत आला (Yashvantrav Smarak) आहे.
या प्रस्तावाला काही राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. महापालिकेच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत हे अनुदान रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा मुद्दा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला (Yashvantrav Smarak) आहे.
