कलाकार कितीही मोठा असला, तरी त्याच्या आत एक अतिशय मनस्वी, संवेदनशील आणि कधी कधी लहरी आत्मा दडलेला असतो. एकदा त्याने मनाचा आवाज ऐकला, की मग तो प्रसिद्धी, मानधन, व्यासपीठ यांचा विचार करत नाही. तो फक्त संगीत, साधना आणि सेवेलाच महत्त्व (Pt Jairaj Kalshi) देतो.
असाच एक मनस्वी कलाकार आज आकुर्डी येथे अनुभवायला मिळाला.देश-विदेशात लाखोंचे मानधन घेऊन मैफिली करणारे, सुफी, गजल आणि शास्त्रीय गायनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे पंडित जयराज कलशी यांनी आज आकुर्डी येथील शनी मंदिरात अत्यंत छोट्या, साध्या जागेत कोणतेही मानधन न घेता रामभजने सादर करत एक आगळीवेगळी सेवा(Pt Jairaj Kalshi) दिली.
जग मे सुंदर है दो नाम, राम आयेंगे, राम सियाराम अशी अवीट भजने त्यांनी सुंदर आवाजात गात आबालवृद्धाना खुश केले
*लहान जागा… पण मोठा अनुभव*
अतिशय सुंदर, भारदस्त आवाज, शास्त्रीय संगीताची सखोल बैठक आणि भक्तीचा ओघ—यामुळे ही छोटीशी मैफलही उपस्थित श्रोत्यांसाठी अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरली. कुठलाही लवाजमा नाही, कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा नाही—फक्त रामनाम आणि सुरांची साधना.भजने ऐकताना श्रोते जणू काळ-वेळ विसरून गेले (Pt Jairaj Kalshi) होते.
समृद्ध संगीत प्रवास
पंडित जयराज कलशी हे सुफी आणि गजल गायनातील नावाजलेले कलाकार आहेत.दिल्ली येथे त्यांनी उस्ताद जफर अहमद खान यांच्याकडे दिल्ली घराण्याचे शास्त्रीय संगीत आत्मसात केले, तर पुण्यात ना. वा. दिवाण यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याचे सखोल (Pt Jairaj Kalshi)प्रशिक्षण घेतले.
गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ते सुफी संगीत, भजने आणि गजल यांचे कार्यक्रम सातत्याने सादर करत आहेत. भारतासह जर्मनी, थायलंड यांसारख्या देशांमध्ये त्यांनी मैफिली घेतल्या, तसेच म्युझिक वर्कशॉप्सही घेतली (Pt Jairaj Kalshi) आहेत.
गायकच नव्हे, गुरूही
आजवर त्यांनी ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ गायकच नव्हे, तर संगीत समजून घेणारी संवेदनशील माणसे घडली, असे अनेक सांगतात.मुळचे पंजाबचे, दिल्लीत शिक्षण घेतलेले जयराज कलशी गेल्या ३५ वर्षांपासून पुण्यात स्थायिक (Pt Jairaj Kalshi) आहेत.
शास्त्रज्ञ ते संगीतसाधक
विशेष म्हणजे, पंडित जयराज कलशी हे मायक्रोबायोलॉजीचे पदवीधर असून एकेकाळी ते शास्त्रज्ञ म्हणूनही कार्यरत होते. मात्र मनाचा आवाज ऐकून त्यांनी पूर्ण वेळ संगीत क्षेत्रात स्वतःला झोकून दिले.आज त्यांचे संगीत हे केवळ कला न राहता साधना आणि सेवा बनले (Pt Jairaj Kalshi) आहे.
१०८ हनुमान मंदिरांमध्ये मोफत भजनसेवेचा संकल्प
पंडित जयराज कलशी यांनी १०८ हनुमान मंदिरांमध्ये मोफत भजन सेवा देण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत त्यांनी ८ ठिकाणी ही सेवा दिली असून, पुणे आणि देशभर फिरून हा संकल्प पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार (Pt Jairaj Kalshi) आहे.
आज आकुर्डी येथील शनी मंदिरात दिलेली सेवा ही पिंपरी-चिंचवड शहरातील त्यांची पहिली भजन सेवा ठरली. त्यामुळे ही मैफल केवळ संगीत कार्यक्रम न राहता शहराच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक सुंदर क्षण ठरली (Pt Jairaj Kalshi) आहे.
कलेचा खरा अर्थ
आजच्या काळात जिथे कार्यक्रम म्हणजे मंच, लाईट्स, प्रसिद्धी आणि मानधन असे समीकरण झाले आहे, तिथे पंडित जयराज कलशी यांची ही निःस्वार्थ सेवा एक वेगळाच संदेश देते—“संगीत हे ऐकण्यासाठी नव्हे, तर अनुभवण्यासाठी असते.”आकुर्डीतील ही छोटीशी पण हृदयस्पर्शी रामभजन मैफल याच अर्थाने मोठी (Pt Jairaj Kalshi) ठरली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आकुर्डी येथील व्यावसायिक संजय संचेती आणि मंजू संचेती यांनी विशेष परिश्रम घेतले, त्यांची नात स्वरा हिचे जयराज कलशी गुरु आहेत, एकूणच काल आकुर्डी येथील भक्तांना अचानक राम भजने ऐकायला मिळाल्याने त्यांचा शनिवार सार्थकी लागला अशीच भावना त्यांनी व्यक्त केली.
विवेक कुलकर्णी
