Home गुन्हे Shilpa Gaware Suicide:माहेरच्या संपत्तीतला हिस्सा आणण्यासाठी तगादा; वाकडमध्ये विवाहितेची आत्महत्या

Shilpa Gaware Suicide:माहेरच्या संपत्तीतला हिस्सा आणण्यासाठी तगादा; वाकडमध्ये विवाहितेची आत्महत्या

४२ वर्षीय शिल्पा गवारे यांच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांना अटक; माहेरच्या कुटुंबीयांकडून हत्येचा संशय

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ): माहेरच्या संपत्तीतून हिस्सा घेऊन येण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून ४२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना वाकड परिसरात घडली. शिल्पा सचिन गवारे असे मृत विवाहितेचे नाव (Shilpa Gaware Suicide)आहे.

 

शिल्पा यांच्या माहेरच्या संपत्तीत हिस्सा घेऊन येण्यासाठी त्यांचे पती व सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर दबाव आणला जात होता. तसेच वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मागण्यासाठी त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या कारणावरून शिल्पा यांना वारंवार शिवीगाळ तसेच मारहाण करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले (Shilpa Gaware Suicideआहे.

 

या सततच्या छळाला कंटाळून शिल्पा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी पती सचिन गवारे, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चौघांनाही अटक करण्यात आली (Shilpa Gaware Suicide)आहे .

 

दरम्यान, शिल्पा यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली (Shilpa Gaware Suicide)आहे.

 

शिल्पा यांचा किती कालावधीपासून छळ सुरू होता, छळाचे नेमके स्वरूप काय होते आणि त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा तपास वाकड पोलिसांकडून सुरू(Shilpa Gaware Suicide) आहे.

 

माहेरच्या संपत्तीतील हिस्सा मिळवण्यासाठी विवाहितेवर दबाव आणणे आणि त्यासाठी मानसिक किंवा शारीरिक त्रास देणे हा गंभीर प्रकार असल्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00