चिंचवड (दि. १०) : चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज विश्वशांतीच्या उद्देशाने सामुदायिक नवकार महामंत्र पठणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात संस्थेअंतर्गत विविध शैक्षणिक घटकांतील सुमारे ५,००० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले (Navkar Day Celebration) होते.
या कार्यक्रमात प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज तसेच प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथील विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत नवकार महामंत्राचा जप करून शांतता, एकता आणि सकारात्मकतेचा संदेश (Navkar Day Celebration) दिला.
यावेळी संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, “संपूर्ण विश्वात शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, या हेतूने ‘विश्व नवकार दिवस’ निमित्ताने जगभरात एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजात एकात्मता आणि सद्भावना वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज (Navkar Day Celebration)आहे.”
हा कार्यक्रम जितो पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी नवकार महामंत्राचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व उपस्थितांना सविस्तरपणे स्पष्ट(Navkar Day Celebration) केले.
कार्यक्रमाला डॉ. सचिन बोरगावे, डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. पौर्णिमा कदम, डॉ. वृंदा जोशी, डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित (Navkar Day Celebration)होते.
या सामुदायिक जपातून “जगात शांतता नांदो” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग (Navkar Day Celebration)नोंदवला.
