पुणे – बनावट व अनधिकृत औषधांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने औषध व्यवसायिकांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन जारी केले आहे. औषध खरेदी करताना केवळ संघटनेचे सभासद असलेल्या अधिकृत व परवानाधारक घाऊक व्यापाऱ्यांकडूनच औषधे खरेदी करावीत, अन्यथा रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा संघटनेने दिला(Unauthorised Medicines) आहे.
संघटनेचे सचिव अनिल पोपटराव बेलकर यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चुकीच्या किंवा अनधिकृत स्रोतांतून खरेदी केलेली औषधे रुग्णांच्या जीवितास धोका ठरू शकतात. यासोबतच अशा प्रकारांमुळे संबंधित रिटेल औषध व्यावसायिकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू (Unauthorised Medicines)शकते.
याचप्रमाणे, सर्व घाऊक औषध व्यापाऱ्यांना देखील संघटनेतर्फे स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की, भरघोस सवलती, स्कीम किंवा कमी दरांच्या आमिषाला बळी पडून संशयास्पद व अनधिकृत ठिकाणांहून औषध खरेदी करू नये. औषध वितरण हा अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय असून, प्रत्येक टप्प्यावर कायदेशीरता व पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी( Unauthorised Medicines)नमूद केले.
संघटनेने पुढे स्पष्ट केले आहे की, यापुढे कोणत्याही घाऊक व्यापाऱ्याने चुकीच्या किंवा अनधिकृत ठिकाणांहून औषध खरेदी केल्यामुळे संबंधित रिटेलरवर प्रशासकीय कारवाई झाल्यास, त्याचा संपूर्ण खर्च किंवा आर्थिक नुकसान संबंधित घाऊक व्यापाऱ्याकडून भरपाई स्वरूपात वसूल केले(Unauthorised Medicines) जाईल.
तसेच, बेकायदेशीर किंवा नियमबाह्य काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात – तो संघटनेचा सभासद असला तरी – पोलिस किंवा प्रशासकीय कारवाई झाल्यास त्या व्यक्तीच्या पाठीशी संघटना उभी राहणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात (Unauthorised Medicines)आला आहे.
शेवटी, सर्व औषध व्यावसायिकांनी कायद्याचे काटेकोर पालन करून गुणवत्तापूर्ण, सुरक्षित व विश्वासार्ह औषध वितरण व्यवस्थेची जोपासना करावी, असे आवाहन केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टतर्फे करण्यात आले (Unauthorised Medicines)आहे.

