(पिंपरी, २१ सप्टेंबर ): महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने तसेच बीना इंग्लिश मीडियम स्कूल व बीना स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी-चिंचवड थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने पुणे विभागस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा रविवारी (२० सप्टेंबर) आकुर्डी येथील बीना स्पोर्ट्स क्लबच्या सभागृहात उत्साहात पार (Thai Boxing)पडल्या.
पुणे विभागातील सात जिल्ह्यांमधून तब्बल ३७० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. विविध वयोगट व वजनगटांत झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी कौशल्य, जिद्द, शिस्त आणि क्रीडाभावनेचे प्रदर्शन केले. अंतिम निकालात पिंपरी-चिंचवड शहर संघाने प्रथम क्रमांक पटकावला. अहिल्यानगर जिल्हा संघाने द्वितीय, तर सोलापूर जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात (Thai Boxing)आले.
उद्घाटन सोहळ्यास बीना स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष अजहर खान, शहाजी आतार, पिंपरी-चिंचवड अल्पसंख्याक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष युसुफ कुरेशी, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी अध्यक्ष तथा भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाचे पी. वाय. आतार, बीना स्पोर्ट्स क्लबचे अखमल खान आणि पी. के. स्कूलचे स्पोर्ट्स प्रमुख राहुल कोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित (Thai Boxing)होते.
स्पर्धेचे तांत्रिक कामकाज पुणे विभाग थाई बॉक्सिंगच्या अध्यक्षा प्रियंका मट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. राष्ट्रीय पंच नाझीम शेख, अरबाज शेख, किरण माने, गायकवाड कारभारी आणि स्वप्निल वारुळे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. गणेश मांढरे व अभिषेक शिंदे यांनी स्पर्धेचे नियोजन केले, तर रविराज गाढवे यांनी सूत्रसंचालन (Thai Boxing)केले.
विजेत्या खेळाडूंचे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले. आगामी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देताना, थाई बॉक्सिंगसारख्या स्पर्धांमुळे युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, शिस्त, धैर्य आणि क्रीडावृत्ती विकसित होण्यास मदत होते, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त(Thai Boxing) केला.
