प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडच्या रावेत परिसरात फर्निचर मॉलवर गोळीबार करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या बिष्णोई गँगच्या तिघा शार्पशूटरना अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने उत्तराखंडमधून जेरबंद केले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले (Ravet Firing Case)आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रवीण राम निवास (रा. झज्जर, हरियाणा), पंकज कुलदीप राठी (रा. रोहतक, हरियाणा) आणि सागर अजय पाल (रा. सोनपत, हरियाणा) यांचा समावेश आहे. हे तिघे आरजू बिष्णोई आणि कुलदीप कशिश गँगशी संबंधित असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली (Ravet Firing Case)आहे.
१५ मे रोजी रात्री रावेतमधील नामांकित फर्निचर मॉलवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. अवघ्या काही सेकंदांत तब्बल आठ गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली (Ravet Firing Case)नाही.
घटनेनंतर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा माग काढला. इंदूर, चंदीगड, रोहतक आणि हरिद्वारपर्यंत आरोपींचा पाठलाग करण्यात आला. अखेर उत्तराखंडमधील एका लॉजमध्ये आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आरोपींना विमानाने पुण्यात आणण्यात (Ravet Firing Case)आले.
गोळीबारानंतर सोशल मीडियावरूनही दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट…” अशा आशयाची धमकीची पोस्ट व्हायरल झाली होती. ही पोस्ट बिष्णोई गँगशी संबंधित शुभम लोणकरच्या सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली (Ravet Firing Case)होती.
दरम्यान, फर्निचर मॉलच्या मालकाला काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. खंडणी उकळण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठीच हा गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात आणखी काही जण सहभागी आहेत का, याचा तपास सध्या सुरू (Ravet Firing Case)आहे.
