पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १०) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन (Garbage Depot Accident) केले.
दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे तसेच नगरसेवक निलेश तरस, राजेंद्र तरस, बापू कातळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले(Garbage Depot Accident) होते.
मोशी दुर्घटनेला ४८ तासांहून अधिक कालावधी उलटूनही बचावकार्य सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या दुर्घटनेतील जीवितहानीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना तात्काळ निलंबित करून निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी (Garbage Depot Accident) केली.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि जखमींना योग्य मदत मिळावी, अशी भूमिका (Garbage Depot Accident) मांडली.
दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात (Garbage Depot Accident) आला.
